शनिवारी नगर जिल्ह्यात प्रथमच मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले. यामध्ये जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी वारा, पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली असली, तरी या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शनिवारी झालेला पाऊस (मि.मी.) असा : नगर (२७.९), पारनेर (१३.८), श्रीगोंदा (१३.३), कर्जत (१७.३), जामखेड (३१.३), शेवगाव (१४.६), नेवासा (८.१), राहुरी (४.७), संगमनेर (१०), अकोले (१३.२), कोपरगाव (४.२), श्रीरामपूर (१९.६), राहता (३.६), सर्वाधिक पाऊस जामखेडमध्ये ३१ मिलिमीटर, तर त्याखालोखाल नगर तालुक्यात २७.९ मिलिमीटर एवढा झाला. नगर तालुक्यामध्ये वाळकी मंडळात सर्वाधिक ६६ मिलिमीटर पाऊस झाला, तर नालेगाव १२, केडगाव ३०, भिंगार २१, चिचोंडी पाटील ५०, कापूरवाडी १८ मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील टाकळी येथे ३० मिलिमीटर, तर कोरडगाव येथे ४२ मिलिमीटर पाऊस झाला. नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ३६ मि.मी., जामखेड तालुक्यातील जामखेड २८, खर्डा ५०, नान्नज २१, नायगाव ५२, अकोले तालुक्यातील कोतुळ ४४, तर श्रीरामपूर तालुक्यातील उण्डेगाव येथे सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.