अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी १८४२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत १९९८ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ९८३ इतकी झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नगर शहर, कर्जत, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, शेवगाव या तालुक्यांनीही रुग्णांचा सोमवारचा आकडा शंभरीपार केला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३७ आणि ॲण्टिजेन चाचणीत १००४ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २१८, जामखेड ६७, कर्जत ७९, कोपरगाव १, नगर ग्रामीण ४१, नेवासा ८, पारनेर ३८, पाथर्डी २३, राहाता १९, राहुरी ९, संगमनेर ६७, शेवगाव १५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ३७, कॅन्टोनमेंट बोर्ड १३, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ९८, अकोले ११, जामखेड ४, कर्जत ३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण २२, नेवासा ९, पारनेर ४, पाथर्डी ६, राहाता ७४, राहुरी १४, संगमनेर २३, शेवगाव २, श्रीगोंदा २, कॅन्टोनमेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा १४ आणि इतर राज्ये २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
ॲण्टिजेन चाचणीत आज १००४ जण बाधित आढळून आले. नगर शहर ६६, अकोले ७१, जामखेड २, कर्जत १४०, कोपरगाव ५१, नगर ग्रामीण ८७, नेवासा ६५, पारनेर ४४, पाथर्डी १०५, राहाता ३१, राहुरी १०५, संगमनेर २१, शेवगाव ८८, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर ५९, कॅन्टोनमेंट बोर्ड २ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.