शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

नगर मनपा निवडणूक २०१८ : सेना-भाजपची छुपी युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:39 AM

‘तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशीच स्थिती सध्या शिवसेना-भाजपची बघायला मिळते आहे.

सुदाम देशमुखअहमदनगर : ‘तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशीच स्थिती सध्या शिवसेना-भाजपची बघायला मिळते आहे. दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविण्याची भाषा करीत असले तरी दोन्ही पक्षांना पॅनल तयार करण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची ‘छुपी’ किंवा ‘पडद्याआडची युती’ पहायला मिळणार आहे.महापालिकेत सध्या शिवसेनेचे १८ आणि भाजपचे १२ नगरसेवक आहेत. याशिवाय दोन्ही पक्षांनी एक-दोन नगरसेवक पुरस्कृत केले होते. राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक फुटल्याने अडीच वर्षानंतर शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती. निवडून येण्याच्या क्षमतेनुसार ए, बी, सी अशी कॅटेगिरी तयार करण्यात आली होती. ज्या भागात उमेदवार मिळू शकत नाही, तो भाग त्या-त्या पक्षाच्या ‘सी’ कॅटेगिरीमध्ये समाविष्ट केला होता. यावेळीच्या निवडणुकीमध्ये युतीच होणार नसल्याने कॅटेगिरीचा प्रश्नच राहणार नाही. महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणायची, असा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी चंग बांधला आहे. महापालिकेतील सत्तेवरच त्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे, असे भाजपने निश्चित केले आहे. खा. दिलीप गांधी यांनी ‘४० प्लस’चा नारा दिला आहे. असे असले तरी ३० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. सध्याच्या स्थितीनुसार अद्याप निम्या प्रभागात भाजप तगड्या उमेदवारांच्या शोधात आहे. किमान २७ ते ३० जागांवर भाजपला उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. याही परिस्थितीत खा. दिलीप गांधी स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनाही युती व्हावे, असेच वाटते आहे. मात्र खा. गांधी हे स्वतंत्र लढण्यावर सध्यातरी ठाम आहेत.‘काहीही झाले तरी शहरात नंबर वनलाच रहायचे’, असा शिवसेनेने चंग बांधला आहे. पूर्वीपेक्षा दोन-चार जागा जास्तच मिळतील, अशीच सेनेची व्यूहरचना आहे. मात्र ६८ जागांवर लढण्यासाठी शिवसेनेलाही उमेद्वार मिळतील, अशी शक्यता नाही. चार जणांचा पॅनल तयार झाला तरी ते एकोप्याने प्रचार करतील, अशी खात्री कोणी द्यायला तयार नाही. ज्या भागात शिवसेना चार उमेदवार देऊ शकत नाही, अशा प्रभागात काही अपक्षांना पुरस्कृत करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. एखादा उमेद्वार अन्य पक्षाच्या उमेदवारांसोबत छुपा पॅनल तयार करू शकतो, अशीच स्थिती आहे.

नेत्यांची भूमिका गुलदस्त्यातभाजपचे प्रदेश सरचिटणीस सूरजीतसिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचे कानमंत्र दिले. यावेळी त्यांनी ‘मतविभाजनाची आमची भूमिका नाही’, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नाही, असे सांगत सेनेच्या प्रस्तावाची भाजपला अपेक्षा असल्याचेच त्यातून ध्वनीत झाले. दुसरीकडे खऱ्या भाजपशी आमची युती आहे. काही भागात भाजपशी आमची युती राहील, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. यावरून वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय झाला तरी नगर महापालिकेत शिवसेना-भाजपची छुपी युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केडगावमधून धडाकेडगावच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले होते. तिथेही भाजपने भरपूर प्रचार केला, मात्र तिथे भाजप उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकला नव्हता. भाजपच्या उमेदवारामुळे सेनेच्या मतांचे विभाजन झाल्याची तिथे चर्चा होती. शिवसेना-भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली तर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता दोन्ही पक्षातील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. युतीची चर्चा करण्यास अनिल राठोड आणि दिलीप गांधी एकत्र येणे कठीण असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळेच काही भाजपच्या इच्छुकांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याकडे धाव घेतल्याचे दिसते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका