अहमदनगर : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. पाथर्डी येथे रविवारी झालेल्या दसरा मेळावा कृतिसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांनी महंत शास्त्री यांच्या ‘सुपारी’ची भाषा वापरली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला.गतवर्षीप्रमाणेच भगवानगडावर दसºयाच्या दिवशी कोणताही राजकीय मेळावा होणार नाही, अशी ठाम भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे. शास्त्री यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन गडावर राजकीय मेळाव्याला बंदी घालण्याची मागणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थकांचा गडावरच मेळावा घेण्याचा आग्रह आहे. दसरा मेळावा कृतिसमिती स्थापन झाली असून, गावोगावी बैठका सुरू आहेत.रविवारी पाथर्डी येथे बैठकीत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याने महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुद्ध सुपारीची भाषा वापरली. तो व्हिडीओ व्हायरल झाला. दोन दिवसांपूर्वी गडावर अज्ञात लोकांचा वावर दिसल्याने पोलिसांनी गडावर बंदोबस्त वाढवला आहे.<विषय मिटवून टाकूचांगले किंवा वाईट काम करणाºयांचेच समाजात नाव निघते. मधल्याला कोणीच विचारत नाही. गुत्ती सुपारी देऊन टाका. कोणी सुपारी घेणारे असतील, तर त्यांचे नाव सांगा. ‘त्याचा’ एकदाचा विषय मिटवून टाकू. ‘सुपारी’ शब्द अवघड वाटत असला, तर ‘टेंडर’ असा शब्द वापरा. मेळावा कुठे होईल, काय होईल, याची मग चिंताच नसेल. काय करायचे ते एकदाच करा. एकदाच तोडून टाका, असे सांगणारा भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.समाजाचे काम करताना संत कशाचीही भीती बाळगत नसतात. त्याची जाण ही भाषा करणाºयांना नसावी. राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचले आहे. त्याबाबत न बोललेले बरे.- महंत नामदेवशास्त्री सानप, भगवानगड
नामदेव शास्त्रींच्या ‘सुपारी’ची भाषा, व्हिडीओ व्हायरल; मुंडे समर्थकांच्या बैठकीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:24 AM