PM Modi in Shirdi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 लाभार्थ्यांना घराची चावी सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 10:31 AM
मोदींच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन
शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अहमदनगरच्या विमानतळावर आगमन झालं आहे. थोड्याच वेळात मोदी साई समाधी शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. याशिवाय मोदींच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजनदेखील करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चावी देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Live Updates:- आस्था, अध्यात्माला विकासाशी जोडण्याचा प्रयत्न- मोदी- शेतीबरोबर पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न- मोदी- राज्यात जलयुक्तमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त आणि 9 हजार दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर- मोदी- दुष्काळ निवारण्याच्या कामात आम्ही राज्य सरकारसोबत- मोदी- देशातील 50 कोटी लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळेल, महिनाभरात एक लाख रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार झाले- मोदी- पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भगिनींशी संवाद साधून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला, यातून कामाची प्रेरणा मिळाली- मोदी- आधी एक घर बांधायला दीड वर्ष लागायचं, आता वर्षभरात घर बांधून होतं- मोदी- मूलभूत सोयीसुविधा असलेली घरं देत आहोत- मोदी- आधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी- नियत स्वच्छ असली की काम जलद गतीनं होतात- मोदी- आधीचं सरकार असतं, तर तुम्हाला घरं मिळायला 20 वर्षे लागली असती- मोदी- आम्ही 4 वर्षात 1 कोटी 25 लाख घरं उभारली- मोदी- आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं उभारली- मोदी- आधीही योजना आल्या, पण त्या फक्त मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून- मोदी- 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर माणसाला घर देण्याचा प्रयत्न, त्यातील अर्धा टप्पा पूर्णत्वास- मोदी- नवरात्र ते दिवाळी नवीन काही घेण्याचा, खरेदीचा मोसम याच मुहूर्तावर महाराष्ट्र मधील गरिबांना घरे देण्याची संधी मिळाली- मोदी- गरीबाच्या कल्याणासाठी शिर्डी निवडल्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद- बाबांच्या शिकवणुकीचं संस्थानाकडून अनुकरण- मोदी- साईंची शिकवण समाजाला एकत्र बांधणारी- मोदी- बाबांच्या स्मरणानं गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते- मोदी- शिर्डीतील कणाकणात साईबाबा वास करतात- मोदी- मोदींकडून भाषणाची सुरुवात मराठीतून- तुमचं प्रेम हेच माझं सामर्थ्य, त्यातून ऊर्जा मिळते- मोदी- पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात- पंतप्रधानांकडून घरकुलांचं वाटप - पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फर्न्सिगच्या माध्यमातून मराठीतून संवाद -राज्यातील 29 जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलाचे ई-वितरण- साई संस्थानच्या दर्शन बारी, शैक्षणिक संकुल, साई गार्डन (नॉलेज पार्क) व दहा मेगावॉट सोलर प्रोजेक्टचे प्रातिनिधिक स्वरूपात भूमिपूजन- साई समाधी शताब्दी वर्षाला सुरुवात झाल्यानंतर फडकावण्यात आलेला ध्वज मोदींनी उतरवला- मोदींच्या उपस्थितीत साईबाबांची आरती- मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच शिर्डीत- पंतप्रधान मोदींकडून साईबाबांचं दर्शन- थोड्याच वेळात पंचारतीला सुरुवात होणार- साई मंदिर परिसरात पंतप्रधानांचे आगमन, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे पंतप्रधानांसोबत- थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते साईबाबा मंदिरात पूजा - विमानतळावरुन मोदी हेलिकॉप्टरनं शिर्डी संस्थानच्या हॅलिपॅडकडे रवाना- सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिर्डी विमानतळावर आगमन