पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत २४ एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त सन २०२०-२०२१ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १७ पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायती व १ पंचायत समिती पात्र झालेल्या होत्या. पंचायत समिती राहाता यांना पंचायत समिती स्तरावरील सामान्य विभागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत चंद्रापूर व लोहगाव यांना सामान्य विभागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार व लोणी बुद्रूक (ता. राहाता) यांना ग्राम विकास आराखडा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहाता पंचायत समिती सभापती नंदा तांबे, उपसभापती, तसेच गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह ग्रामपंचायत पुरस्कारार्थी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत चंद्रापूर, लोहगाव व लोणी बुद्रूक यांना पुरस्कृत करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त पंचायत राज संस्थांचे अभिनंदन व नियोजन केले.
------------
फोटो मेलवर
२४ पंचायत राज पुरस्कार
पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार अंतर्गत नगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि राहाता तालुक्यातीलच लोणी बुद्रूक, चंद्रापूर व लोहगाव या तीन ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनीही पुरस्कार प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले.