शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 6:14 PM

तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील करंजी ते मिडसांगवी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहेत. या महामार्गावरील अपघातामध्ये आजपर्यत गेल्या तीन वर्षात १२० प्रवाश्यानी जीव गमवावा असून १३५ प्रवाश्याना कायमचे अपंगत्व आले आहे. तीन वर्षापासून रखडलेल्या महामार्गामुळे करंजी घाट ते मिडसांगवी दरम्यान दररोज एक अपघात होत आहे. पाथर्डी तालुक्यात महामार्गावर २०१६ मध्ये ३९ मृत्यू झाले तर ३५ जणांना अपंगत्व आले. २०१७ मध्ये ३५ मृत्यू झाले तर ४२ जणांना अपंगत्व स्वीकारावे लागले. २०१८ मध्ये ४० मृत्यू तर ६० जणांना अपंगत्व आले. तीन वर्षात ११४ जणांना जीव गमवावा लागला. तर १३७ व्यक्तींना अपंगत्व आले. शहरातून बांधण्यात येणा-या गटारीचे काम अर्धवट असल्याने सांडपाणी महामार्गावरून वाहल्याने मोठमोठे खड्डे पडून अपघातात भर पडली. तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने ५५ कि.मीच्या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, फलक, खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.रस्त्याच्या खराब कामामुळे होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अ‍ॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. - अ‍ॅड.बाळासाहेब बोडखे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर