त्याअनुषंगाने डोंगरगण येथे ३४ गर्भवती महिलांसाठी चिक्कीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डोंगरगण गावच्या सरपंच वैशाली मते होत्या, तर अध्यक्षस्थानी राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. याप्रसंगी सरपंच मते यांनी आपल्या भाषणात गर्भवती महिलांच्या पोषणाबाबत जागृत होण्याबाबतची आवश्यकता व्यक्त करून महिलांसाठी सकस आहाराविषयी माहिती दिली व त्यांच्यात मातृत्व संवेदना जागृत केल्या.
डॉ. माधव सरोदे यांनी आरोग्य संपदा व निसर्ग प्रेम जोपासण्याचे आवाहन करून युवती व महिलांनी आपली बौद्धिक पातळी उंचावण्यासाठी नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमात डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मते, ग्रामसेवक सौदागर, उपप्राचार्य प्रा. नासीर सय्यद, प्रा. सतीश शिर्के उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम कानडे
यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी ठुबे यांनी केले, तर आभार डॉ. गणेश विधाटे यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुश्री भागवत, डॉ. एजाज शेख, डॉ. शंकर केकडे, डॉ. बंडेराव तन्हाळ, डॉ. सतीश सायकर, प्रा. विलास येलके, डॉ. मुबारक शेख, प्रा. अनिल जाधव, प्रा. अजय जाधव, प्रा. दशरथ शेळके, नितीन राठोड, बापू वढणे, साळवे, संतोष चव्हाण आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य शाखेतून बारावीला प्रथम आलेली विद्यार्थिनी भैरवी भुतकर हिचा सत्कार करण्यात आला.
----------
फोटो २१काळे काॅलेज
राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, महिला बालकल्याण मंत्रालय आणि डोंगरगण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय पोषण महिना' साजरा करण्यात आला.