भारतीय क्रीडा प्राधिकरण, शालेय क्रीडा प्रमोशन फाऊंडेशन व आत्मा मालिक शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावले.
कोपरगाव : भारतीय क्रीडा प्राधिकरण, शालेय क्रीडा प्रमोशन फाऊंडेशन व आत्मा मालिक शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावले.अंतिम सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेश संघावर २० विरूध्द २१ गुणाने मात केली. उत्तरप्रदेशला द्वितीय तर राजस्थानला तृतीय क्रमांक मिळाला. व्हॉलीबॉल संघटनेचे पार्थ दोशी, सहाय्यक संचालक रवी पंडीत, राष्ट्रीय पंच रमेश विद्यार्थी आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठाचे माजी कर्णधार सुभाष पाटणकर व आश्रमाचे विश्वस्त प्रकाश भट यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. क्रीडा विभाग प्रमुख अशोक कांगणे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शशेंद्र त्रिपाठी, सुरेश शिंदे, अक्षय शिंदे, बाळासाहेब कोतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
आजच्या युगात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक तंदुरूस्ती महत्त्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने खेळ खेळणे आवश्यक आहे. आत्मा मालिकमध्ये सर्व क्रीडा प्रकार, मैदाने व प्रशिक्षक असुनप्रत्येक विद्यार्थ्याला खेळात सहभागी करण्याची दक्षता घेतली जाते.-प्रकाश भट, विश्वस्त