पारनेर : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिका-यांना धारेवर धरले.तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या़ विहिरीची प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विहिरीची प्रकरणे मंजूर करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी टक्केवारी मागतात, असा आरोप आंदोलकांनी केला़ याबाबत गटविकास अधिका-यांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही, असेही काही शेतक-यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती अरुण ठाणगे, शंकर नगरे, दीपक नाईक, योगेश मते, किसनराव रासकर, सरपंच सतीश पिंपरकर, महेंद्र मगर, डॉ. आबा खोडदे, भाऊसाहेब पांढरे, भाऊसाहेब खेडेकर, विकास झावरे, बाळकृष्ण जगदाळे, साहेबराव नरसाळे आदी उपस्थित होते.
पारनेर पंचायत समितीत राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:49 PM