नवनागापूर परिसर शहराजवळ असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार उमेश पाटील यांनी आदेश काढून ९ एप्रिलअखेर रात्री १२ वाजेपर्यंत नवनागापूर परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनास आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गावातील अत्यावश्यक सेवावगळता सर्व गाव बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले. अत्यावाश्यक सेवा म्हणून किराणा दुकान, दूध, भाजीपाला सकाळी ८ ते १२ या वेळेत चालू राहतील. दवाखाने, मेडिकल दुकाने २४ तास चालू राहतील. कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अतिशय कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे. नवनागापूर गावाजवळ एमआयडीसी आहे.
..............
...हा भाग होणार बंद
नवनागापूर परिसरातील साईनाथ नगर, आंधळे चौरे फेज, वडगावगुप्ता रोड, गजानन कॉलनी, मानोरमा कॉलनी, ज्ञानदीप शाळा, स्वाती कॉलनी, आंबेकर घर रस्ता, नगर मनमाड रोड, चेतना कॉलनी, डॉ. पगारे हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद विद्यालय, तळेकर घर रस्ता, नवजीवन कॉलनी, दांगट मळा, सम्राट नगर, आंनद नगर हे कन्टेन्मेंट झोन, तर नगर मनमाड रोड खंडोबा मंदिर, वक्रतुंड कॉलनी, अरुण हॉटेल हा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.