कोकणातील रायगड जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना पिण्यासाठी पाणी नव्हते की खाण्यासाठी अन्न ही नव्हते. ही दृश्ये पाहून प्रा. स्नेहल सरोदे, राजकुमार सरोदे यांनी पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्धार केला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले. नवनागापूर परिसरातील तरुण, विद्यार्थी व नागरिकांकडून त्यांना मदत मिळाली. खेड्यांमध्ये मदत पोहोचत नसल्याचे सरोदे यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले होते. त्यामुळे जमा झालेली सर्व मदत रायगड जिल्ह्यातील दादली, शिरगाव, चोचिंडे, सवकोल, माटवण, भोराव, आकले, खरवली, ढालकाठी, चराई, साखर, सुतारवाडी, केवनाळे या गावांमध्ये पोहोच केली. ग्रुपच्या सदस्यांनी सॅनिटायझर, मास्क, हॅण्ड ग्लोज यांचा वापर करून व कोरोना नियमांचे पालन करीत जीवनावश्यक वस्तू, पिण्याचे पाणी, कपडे यांची घरोघरी जाऊन मदत केली. या मदत मोहिमेत स्नेहल निर्मळ- सरोदे, विशाल सलगर, सुनील गुंड, प्रसाद चौलकर, विशाल मोरे, अक्षय बेंडके, विपुल कारखानीस, संकेता नरोडे, अतुल मोरे यांनी परिश्रम घेतले.
--
फोटो- ३१सरोदे