अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरुवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांतील गटबाजी चांगलीच उफाळून आली़ पारनेरमधून नव्याने पक्षात आलेल्या निलेश लंके यांच्या उमेदवारीला सुजित झावरे व माधवराव लामखडे यांनी तर, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या उमेदवारीला मंजुषा गुंड यांनी कडाडून विरोध केला़ अन्य मतदारसंघातील इच्छुकांनीही सगळे एकसंघ कसे राहिले तेवढेच तुम्ही पाहा, बाकी आम्ही पाहतो, अशा शब्दात आपल्या भावना पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्या़राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीभवन येथे इच्छुकांच्या मुलाखती झाल्या़ पक्षनिरीक्षक माजी खासदार देविदास पिंगळे, अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आविनाश आदिक, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी उपस्थित होते़ मुलाखतीचा निरोप जिल्ह्यातील सर्व नेत्यांना देण्यात आला होता़ परंतु,ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यासह विद्यमान आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप आणि वैभव पिचड अनुपस्थित होते़ आ़ संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचे वडील आमदार अरुण जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वळसे यांची भेट घेऊन संग्राम यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली़ कर्जतमधून रोहित पवार इच्छुक आहेत़ त्यांनीही मुलाखत दिली़ या मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड याही इच्छुक आहेत़ त्याही मुलाखतीला उपस्थित होत्या़ मुलाखतींच्या प्रक्रियेवर गुंड यांनी अक्षेप घेतला़ त्या म्हणाल्या मुलाखती केवळ फार्स आहे, रोहित दादा कामाला लागले आहेत, आम्ही स्थानिक असूनही विश्वासात घेतले जात नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या़ पारनेरमधून निलेश लंके, सुजित झावरे आणि माधवराव लामखडे आणि प्रशांत गायकवाड यांनी मुलाखती दिल्या़ पक्षात नव्याने येणाऱ्यांना संधी देणार असला तर आम्ही काय सतरंज्या उचलण्याचे काम करायचे, अशा शब्दात झावरे यांनी नाराजी व्यक्त केली़ त्यांना लामखडे यांनीही साथ दिली़ गेल्या विधानसभेला आम्हा दोघांना मिळून ९० हजार मते आहेत़ दोघांपैकी एकाला उमेदवारी द्या, अन्यथा आम्ही उभे राहू,असा इशाराच लामखडे यांनी यावेळी दिला़ त्यामुळे वातावरण चांगलेच तापले़ श्रीगोंद्यातून एकमेव घनश्याम शेलार हे मुलाखतीला आले होते़ आमदार जगताप उपस्थित नव्हते़ फोन केल्यानंतर जगताप बºयाच वेळाने आले़ परंतु, तोपर्यंत त्यांच्या मतदारसंघातील मुलाखती पार पडल्या होेत्या़यांनी दिल्या मुलाखतीकोपरगाव : आशुतोष काळेश्रीरामपूर : प्रदीप अभंग, विजय खाजेकर, प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाणनेवासा : विठ्ठल लंघे, अशोक ढगेशेवगाव : प्रताप ढाकणे,चंद्रशेखर घुले, मंगल नमानेराहुरी : प्राजक्त तनपुरेपारनेर : प्रशांत गायकवाड,निलेश लंके, माधव लामखडे,सुजित झावरे, दीपक पवारनगर शहर : किरण काळे, अरिफोद्दिन शेखश्रीगोंदा : आमदार राहुल,जगताप, घनश्याम शेलारकर्जत : मंजुषा गुंड, बाबासाहेब गांगर्डे, रोहित पवारकोण कुठे याचीच चर्चाराष्ट्रवादीचे वैभव पिचड यांच्यासह संग्राम जगताप, राहुल जगताप, हे पक्षाचे विद्यमान आमदार मुलाखतीला उपस्थित नव्हते़ त्यात पिचड भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती़ अन्य दोन आमदारही गैरहजर असल्याने कोण कुठे आहे, कुणाला भेटले, याची चर्चा मुलाखतीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये होती़काँग्रेस की भाजप, अध्यक्षा विखेंनी स्पष्ट करावेजिल्हा परिषदेतील फेरबदलाबाबत पत्रकारांनी विचारले असता वळसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विखे यांनी भाजप की काँग्रेस ते स्पष्ट करावे़ जिल्हा परिषदेबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले़कळमकरांचा यु टर्नमाजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पक्षाकडे अर्ज केला होता़ मुलाखतीच्यावेळी ते हजरही होते़ पण, त्यांनी मुलाखत दिली नाही़ पक्षाने दिलेल्या अधिकृत यादीतदेखील कळमकर यांचे नाव नसून, त्यांनी मुलाखत दिलीच नसल्याने कळमकर यांनी अचानक माघार का घेतली, याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती़
अहमदनगरमधील राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 6:22 PM