अहमदनगर : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घनश्याम शेलार यांना तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे गेल्या काही दिवसापासून भाजपच्या संपर्कात होते. यामुळे ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्यास नकार दिला आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून घनशाम शेलार यांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे.
प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 11:53 AM