शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:15 PM

भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

शिर्डी : भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवारी (दि.१ मार्च) दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने घेतलेले जलयुक्त शिवारसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय रद्द करण्यात येत आहेत. हे निर्णय घेतांना मागील सरकारमध्ये आपणही होतो, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. सध्याचे सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा़ आमचे विरोधी पक्ष म्हणून बरे चाललेय. शिवसेना सरकारमध्ये असूनही अस्वस्थ आहे का? त्यांनाच विचारा. हिंदुत्व सोडून ते समाधानी असतील तर जनताच निर्णय घेईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भिमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे सोपविण्याचा निर्णय घेतात. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याला विरोध करतात. अनेक निर्णयामध्ये या तिन्ही पक्षात एकवाक्यता नाही. भाजप हे सरकार पाडणार नाही. तशी गरजही नाही. आपसातील विसंवादामुळेच हे सरकार आपोआप कोसळेल, असा दावाही पाटील यांनी केला.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ़ भागवत कराड, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, गजानन शेर्वेकर, किरण बो-हाडे, डॉ.राजेंद्र पिपाडा, भाऊराव देशमुख, प्रा़राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.कर्जमाफी योजना फसवीअवेळी पडलेल्या पावसाने नुकसान झालेल्या ९४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याची जाहीर केल्याप्रमाणे नुकसान भरपाई व शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सध्याची कर्जमाफी योजना फसवी आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. देशातील मुस्लिमांचा वापर राजकारणासाठीच केला जात आहे. आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवून त्यांना भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरवले जात असल्याची टिकाही त्यांनी केली़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण