अहमदनगर: राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शेतापीने विदर्भातून शनिवारी रात्री उशिराने ताब्यात घेतले. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेले अंकुश चत्तर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर फरार झालेला भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मीक्या कांबळे, महेश कुऱ्हे तसेच हाके, या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश यांच्यावर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एकविरा चौकात (सावेडी) भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांनी लोखंडी रोड ,वायर च्या साह्याने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर स्वप्निल शिंदे हा त्याच्या साथीदारांचा फरार झालेला होता. या हल्ल्यात जखमी असलेले राष्ट्रवादीचे अंकुश चत्तर यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यांचा रविवारी रात्री उशिराने मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्या वादातून भाजप चा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या सह 13 ते 14 जणांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश दत्तात्रय चत्तर (रा. पद्मावती नगर, सावेडी) यांच्यावर प्राण घातक हल्ला केला होता. या प्रकरणी चत्तर यांचे दाजी बाळासाहेब भानुदास सोमवंशी यांनी तोफखणा पोलीस ठाण्यात फिरण्यात दिलेली होती. या फिर्यादीवरून भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी (दि.१५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एकविरा चौकात ही घटना घडली होती. एकविरा चौकात काही तरुणांचे भांडण सुरू होते. त्यातील आदित्य गणेश आवटी या तरुणांनी चक्कर यांना फोन करून भांडण सोडविण्यासाठी बोलवले.
चंदन ढवन व चत्तर यांनी हे भांडण सोडले व ते तिथून जात असताना राज फुलारी या तरुणांनी चत्तर यांना थांबविण्यात सांगितले. त्याच वेळी दोन काळ्या रंगाच्या देवास नाव दिलेल्या गाड्या तिथे आल्या. या गाड्यातून नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्या सह अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुरहे व इतर सात ते आठ जण उतरले. त्यांनी लोखंडी रॉड ,काचेच्या बाटल्या वायरने चत्तर यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात चत्तर हे जखमी झाले होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.