आता पूर्वीप्रमाणे मोठे कंटेन्मेंट झोन
अहमदनगर: शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कडक पावले उचलली असून, पूर्वीप्रमाणे मोठे कंटेन्मेंट झोन करण्यात येणार आहे. उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्याकडे याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसा आदेश आयुक्त शंकर गाेरे यांनी सोमवारी जारी केला.
.....
मनपात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अहमदनगर: नगर शहरातील नागरिकांना मास्क सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे धडे देणाऱ्या महापालिकेच्या औरंगाबाद रोडवरी प्रशासकीय इमारतीतच पदाधिकारी व नगरसेवकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. आयुक्तांना भेटण्यासाठी शिष्ट मंडळे येत असून, पालिकेत पूर्वीप्रमाणेच गर्दी हाेत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
....
नगरसेविकेचा आंदोलनाचा इशारा
अहमदनगर: प्रभाग क्रमांक ११ मध्ये भुयारी गटारीचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळही ठेकेदाराने तोडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाणी मिळत नाही. महापालिकेने तातडीने दुुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका परवीन कुरेशी यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.