शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादीच्या 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:00 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकैलास गिरवले, प्रसन्न जोशी यांच्यासह २२ जणांना अटक

अहमदनगर - केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर रविवारी सकाळपासून नगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच  पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जखमी पोलीस नाईक संदीप काशिनाथ घोडके यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, जिल्ह्यातील बहुतांश भागात बंद पाळण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री रामदास कदम, दिवाकर रावते आणि दीपक केसरकर केडगाव येथे जाऊन मृत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. केडगाव येथील सेनेच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयाची मोडतोड केली. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ कार्यकर्त्यांना आतापर्यत पोलीसांनी अटक केली आहे. आमदार शिवाजी कर्डिले, दादाभाऊ कळमकर, सचिन अरुण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखिल वारे, दादा दरेकर, गजानन भांडवलकर, मुसा सादीक शेख, सागर ठोंबरे, घनश्याम बोडखे, सागर पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, सागर डोंगरे, अफजल शेख, कुलदीप भिंगारदिवे, बबलू सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी, सुनिल त्रिंबके, दत्ता तापकीरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादीक अब्दुल रौफ सय्यद, मुस्सदीक सादीक सय्यद, अवधूत जाधव, राजेश परकाळे, धीरज उर्कीडे, मयूर कुलथे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये कैलास गिरवले, शरिफ शेख, राहुल अरुण चिंतामण, अ‍ॅड. प्रसन्न जोशी, सय्यद अकबर, आवेश शेख, सय्यद असिफ, सागर वाव्हळ, संजय वाल्हेकर, अनिल राऊत, अनिकेत चव्हाण, गिरीष गायकवाड, दिपक गाडीलकर, रियाज तांबोळी, दत्ता उगले, कुणाल घोलप, साईनाथ लोखंडे, सचिन गवळी, सोमनाथ गाडेकर, संतोष सुर्य वंशी, धर्मा करांडे, इम्रान शेख यांचा समावेश आहे.आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले असताना राष्ट्रवादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालायवर दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकास करुन अनधिकृतरित्या कार्यालयात प्रवेश केला व बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण करुन जखमी केले. भिंगार पोलीस ठाण्यात भादवि ३५३, ३३३,१४३, १४७,१४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३,७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेSangram Jagtapआ. संग्राम जगतापArun Jagtapआ. अरुण जगतापShiv Senaशिवसेना