नेवासा (अहमदनगर): तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरासरी ८५.३७ मतदान झाले. तालुक्यात ४१ सरपंचपदासह २६२ सदस्यपदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या वडाळा बहिरोबा,भेंडा खुर्द,खुपटी, माळीचिंचोरा येथे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. दुपारनंतर वेग घेतल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी सा़डेतीन वाजेपर्यंत मतदानाने ७९ टक्कयाची सरासरी ओलांडली होती. सर्वाधिक चिंचबन ग्रामपंचायतसाठी ९२.८५% मतदान झाले तर सर्वात कमी सुरेशनगर ग्रामपंचायतीसाठी ७८.९०% मतदान झाले आहे.
तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीसाठी एकूण २४ हजार ४५७ मतदारांपैकी २० हजार ८७९ मतदारांनी आपला हक्क बजावला. सोमवारी मतमोजणी प्रक्रिया नेवासा तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.ग्रामपंचायत निहाय टक्केवारीमाका - ८५.८४अमळनेर - ८९.२४शिरेगाव - ८८.६३चिंचबन - ९२.८५खुपटी - ८५.०७हिंगोणी - ९२.३८माळीचिंचोरा - ८१.३४वडाळा बहिरोबा - ८०.२९भेंडा खुर्द - ८७.०७हंडीनिमगाव - ८७.३४गोधेगाव - ८७.२५कांगोणी - ८८.३५सुरेशनगर - ७८.९०%