नेवासा : नेवासा येथील शिक्षक कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घर फोडून दीड लाख रुपये व चार तोळे तीन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सुमारे दोन लाख तेरा हजार पाचशेचा ऐवज चोरून नेला. ज्ञानेश्वर शुक्रे यांच्या फियार्दीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक कॉलनीत राहणारे ज्ञानेश्वर जयराम शुक्रे हे आपली पत्नी मुली व जावई नातवासमवेत दि.१ जुलै रोजी दुपारी पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते. दि.२ जुलै रोजी सकाळी शेजारी राहणारे मोहन गुजर यांनी शुक्रे यांना फोन करून कळविले की घराचे कुलूप तोडलेले दिसत आहे. त्यानंतर शुक्रे आपल्या परिवारासह घरी आले असता घराचे सेफ्टी डोअरला व आतील दरवाज्याला लावलेले लॉक तोडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता लाकडी कपाटांमधील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. बेडरूममधील लाकडी कपातीचे लॉक तोडून दीड लाख रुपये रोख रक्कम व ६३ हजार पाचशे रुपयांचे ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा २ लाख तेरा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे ज्ञानेश्वर शुक्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा : शिक्षक कॉलनीत घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 4:52 PM