दहिगावने : बदलत्या सामाजिक वातावरणाने आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. हे बदल स्वीकारत अध्ययन, अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब अधिकाधिक होणे आवश्यक बाब असल्याचे प्रतिपादन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.
दहिगावने (ता. शेवगाव) येथे पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. क्षितिज घुले, बबनराव भुसारी, सरपंच सुभाष पवार, अंबादास कळमकर, सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीर शेख, बाजार समितीचे सभापती अनिल मडके, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, प्राचार्य व्ही.एस. मरकड, प्रा. काकासाहेब घुले आदी उपस्थित होते.
यावेळी ९० तरुणांनी रक्तदान केले. तालुक्यातील विविध संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सभापती डॉ. घुलेंचा नागरी सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. विलास मर्ढेकर, डॉ. संदीप आहेर, रामकिसन जाधव, डॉ. श्यामसुंदर कौशिक, डॉ. कैलास कानडे, संभाजी गवळी, डॉ. अरुण पवार, बाळासाहेब मरकड, सुनील गवळी, अण्णासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी के.वाय. नजन यांनी केले. प्रा. मकरंद बारगुजे यांनी आभार मानले.
फोटो ओळी १५ दहिगावने
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केलेल्या दात्यांचा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले व सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.