राहुरी शहरातील पाडुरंग मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. उंबरे, वळण, राहुरी खुर्द, वावरथ जांभळीसह इतर गावातील सदस्यांचाही पद्मश्री पोपटराव पवार, मंत्री तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोपटराव पवार यांनी नूतन सदस्यांना गावात कसे काम करावे, यावर मार्गदर्शन केले.
पोपटराव पवार पुढे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर काही उमेदवार निवडून आले, तर काही पराभूत झाले, परंतु सगळेच आता एकाच गावचे आहेत. गावचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यापुढे ठेवून सत्ता गट-तट विसरून कामाला सुरुवात करा. यातून गावाची व देशाची प्रगती होईल, असे पवार म्हणाले.
राहुरी येथील आमदार प्राजक्त दादा तनपुरे मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, शिवाजी ढवळे, महेश उदावंत, भारत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, दिलीप चौधरी, अशोक आहेर, राहुल शेटे, बाबासाहेब लटके, रवींद्र आढाव, मच्छिंद्र सोनवणे, मनीषा ओहाळ, संगीता आहेर, नगराध्यक्षा अनिता पोपळघट, सूर्यकांत भुजाडी, विलास तनपुरे, विजय माळोदे, गोरक्षनाथ ढोकणे, संदीप दुशिंग आदींसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.