शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

‘त्या’बंदिवानाकडे सापडली नक्षल्यांशी संबंधित बातमी अन् एक चिठ्ठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 5:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचाºयावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया बंदिवानाकडे नक्षलवाद्यांशी संबंधित ...

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचाºयावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया बंदिवानाकडे नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या बातमीचे कात्रण व एक चिठ्ठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ स्थानिक पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेत या बंदिवानाची पूर्ण माहिती काढून याबाबत नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल पाठविला आहे़ पत्नीच्या नातेवाईकांवर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पावलस कचरू गायकवाड याला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़ त्याला जामीन न मिळाल्याने गेल्या काही महिन्यांपासून गायकवाड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे़ गायकवाड याने २२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला़ या प्रयत्नात त्याने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर चाकूने हल्ला केला़ यावेळी गायकवाड याला प्रवेशद्वाराची चावी न मिळाल्याने त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला़ ही घटना कारागृहातील इतर कर्मचाºयांच्या निदर्शनास आली तेव्हा गायकवाड याला पकडले़ याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली़ कारागृहातील कर्मचारी व पोलिसांनी गायकवाड याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे नक्षलवादी हे तरुणांना भरती करून कसे प्रशिक्षण देतात असा आशय असलेली एका वृत्तपत्राची बातमी आढळून आली़ तसेच त्याने त्याची आई व मुलींच्या नावे लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली़ या चिठ्ठीत ‘मला तुमची खूप आठवण येत आहे़ पण आता माझी वाट पाहू नका. मी माझा मार्ग निवडला आहे़’ अशा आशयाचा मजकूर होता़ पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत गायकवाड याच्याबाबत पूर्ण माहिती घेत यासंदर्भात नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल सादर केला आहे़  दरम्यान आधीच्या गुन्ह्यात गायकवाड याला अटक असल्याने दुसºया गुन्ह्यात वर्ग करून घेताना कोतवाली पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे़ —-कोण आहे पावलस गायकवाड ?पावलस गायकवाड हा पाथर्डी येथील रहिवासी आहे़ तो सीआयएसएफमध्ये (सेंट्रल इंटस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) कार्यरत होता़ डिसेंबर २०१४ मध्ये त्याने त्याच्या पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांवर हल्ला केला होता़ याप्रकरणी त्याच्या पत्नीने पावलसविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली होती़ पावलस याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती़ जामीन न मिळाल्याने त्याला सीआरपीएफमधून बडतर्फ करण्यात आले़ सध्या तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे़