अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने चालू राहणार आहेत. याबाबत २९ जानेवारीला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कायम राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगल कार्लयांवर कारवाई करून पहिल्यांदा गर्दी नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यानुसार यंत्रणांना कारवाईचा आदेश दिला आहे.