शिरीष शेलार
जवळे : चालू वर्षी कोरोना प्रादुभार्वामुळे मोजक्या वारकºयांच्या उपस्थितीत भ्संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामा व एकोबा-तुकोबा-निळोबाच्या घोषाने पिंपळनेर नगरीनगरी दुमदुमली होती. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते संत निळोबाराय महाराज यांच्या संजीवनी समाधी व पादुकांचे पूजन करून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी पंढरपूर वारीचा सोहळा होत असतो. परंतु चालू वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व शासनाचे अधिकारी यांनी दिलेले नियमाचे पालन करत वीस भाविकांसह दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी आमदार निलेश लंके यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला व निळोबाराय साकडे घातले की पांडुरंगा देशावरील व राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर कर. माझा शेतकरी राजा सूखी होउ दे.
यावेळी देवस्थान कार्याध्यक्ष अशोकराव सावंत म्हणाले, पंढरपूरच्या आषाढी वारीचे खरे जनक संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज, संत निळोबाराय महाराज यांनी साडेतीनशे वषार्पूर्वी सुरू केलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून चालू वर्षी त्यांच्या पादुका मोजक्या वारकºयांसह पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
यावेळी निळोबाराय देवस्थान अध्यक्ष ज्ञानदेव पठारे कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबाराय वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ मकाशीर, सुरेश पठारे, निळोबाराय महाराज संस्थान सचिव लक्ष्मण खामकर, खजिनदार चांगदेव शिर्के, भाऊसाहेब लंटाबळे हभप विकासानंद मिसाळ महाराज, राजेंद्र पठारे, संपत सावंत, उपजिल्हाधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजय बोत्रे सभापती प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर आदी उपस्थित होते.