देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या नऊ खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्रिमूर्ती क्रीडा संकुल नेवासा फाटा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात सार्थक गुंजाळ ६०० मीटर धावणे -द्वितीय, सोहम बोरुडे लांब उडीमध्ये प्रथम, वेदिका धावडे लांब उडीमध्ये प्रथम, निकिता कोरके लांब उडी द्वितीय क्रमांक मिळविला.
१८ वर्षे वयोगटात शुभांगी वाखारे लांब उडी व तिहेरी उडी- प्रथम, अजिंक्य सरोदे लांब उडी- द्वितीय. २० वर्ष वयोगटात अनिकेत साठे ५००० मीटर धावणे- प्रथम, तुषार साठे- तिहेरी उडी प्रथम, हर्षदा ढवळे- लांब उडी प्रथम क्रमांक मिळविला.
राज्य स्पर्धा १८ ते २२ जानेवारी दरम्यान होणार आहेत.
या सर्वांना क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे राज्य ॲथलेटीक्स असोसिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव, प्राचार्य आर. टी. शिंदे पर्यवेक्षक एस. एम. गाडेकर यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळी : ११ देवदैठण
देवदैठण येथील खेळाडूंचा सन्मान करताना राज्य ॲथलेटीक्स असोसिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव, विजयसिंह मिस्कीन.