शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 2:48 PM

राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले.

अहमदनगर - आपली हटके कीर्तन शैली आणि सोशल मीडियामुळे घराघरात पोहोचलेल्या इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर, आता दोन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नारळ या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, २२७ मतांनी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. आता, त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. 

राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले. भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमधील चढाओढ यात पाहायला मिळाली. त्यावेळी, संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या. शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यात गावकऱ्यांनी विश्वास दाखवत शशिकला यांना विजयी केलं आहे. मात्र, आता त्यांनी थेट भाजपात प्रवेश केला आहे. 

इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी होत असते. विनोदी शैलीनं आणि उदाहरणांनी प्रवचनातून समाजप्रबोधन करण्याची इंदोरीकर महाजारांची पद्धत अनोखी आहे. राज्यात विविध गावांमध्ये त्यांची दररोज प्रवचनं होत असतात आणि त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळते. आता इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई यांनी राजकारणात एन्ट्री घेतली असून सरपंचपदी विराजमान होताच त्यांनी सत्ताधारी भाजपसोबत जाणं पसंत केलं आहे. दरम्यान, निळवंडे गाव हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील असून शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरindurikar maharajइंदुरीकर महाराजBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील