तळेगाव दिघे येथे निळवंडे पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत ते बोलत होते. प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, बाळासाहेब दिघे, संपतराव दिघे, भाऊसाहेब दिघे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गोडगे म्हणाले, डाव्या कालव्याच्या व बोगद्याच्या कामाची पाहणी केल्यावर केवळ विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. निळवंडे धरण कोणत्या सरकारच्या काळात झाले? महसूलमंत्री थोरात यांचे योगदान लक्षात घेता त्यांना वगळून निळवंडे धरणाचा इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही. कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला त्यांच्या प्रयत्नांतूनच पाणी मिळेल. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे प्रकल्पा अंतर्गतच्या डाव्या कालव्याच्या व बोगद्याच्या कामाची तळेगाव भागात पाहणी केल्यावर काहींच्या पोटात गोळा उठण्याचे कारण काय ? असा सवाल करीत कुणाचे तरी हस्तक बनून निळवंडे पाणीप्रश्नांचे राजकारण कुणीही करू नये. याप्रश्नी पुढारपण करणाऱ्यांनी उलट कालव्यांच्या कामात जिथे अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी केले.