सरपंच निर्मला मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राहुरी खुर्दच्या वाळू लिलावाच्या विशेष ग्रामसभेत महसूल विभागाकडून आलेल्या निरीक्षक सोनवने यांनी वाळू लिलावाला संमती देण्यासाठी ग्रामसभेला मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे, रफीक शेख, गेणूभाऊ तोडमल यांनी अगोदर झालेल्या वेळोवेळी झालेल्या वाळू लिलावाचे महसूल विभागाने शासनाचे आदेश असतानाही ग्राम निधीची रक्कम दिलेली नाही. ती रक्कम जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत वाळू उचलू न देण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी या मागणीला एकमुखी पाठिंबा दिल्याने सरपंच निर्मला मालपाणी यांनी ग्रामसभेचा ठराव मंजूर केला.
यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रदीप पवार, उपसरपंच तुकाराम बाचकर, सदस्य राम तोडमल, नरेंद्र शेटे, शिवाजी पवार, शिवाजी शेंडे, भरत धोत्रे, भाऊ जाधव, पोलीस पाटील बननराव अहिरे, ग्रामविकास अधिकारी संभाजी निमसे, तलाठी गडदे, भाऊराव शेडगे, कारभारी गोल्हार, गणेश भांड, प्रकाश शितोळे, बाबा पवार, अमोल डोळस उपस्थित होते.