शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

उपजिल्हा रुग्णालय नव्हे, रेफर सेंटर

By admin | Published: August 08, 2014 12:02 AM

कर्जत : कर्जत रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे.

कर्जत : शासनाने दोन कोटी रुपये खर्च करून कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालय उभारले. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. अहमदनगर, पुणे, बारामती येथे जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये हा उद्देश ठेवून शासनाने सन २००५ मध्ये दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत प्रशस्त इमारत उभारली. तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली. रुग्णांसाठी अद्ययावत यंत्र सामग्री दिली. पण हे सर्व मृगजळच ठरले. सुरूवातीला सर्व सुरळीत चालले. रुग्णांनी येथे प्रतिसाद दिला. जुलै २००९ पासून येथील वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे येथे मंजूर आहेत. यापैकी २ हजर आहेत. इतर पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिका ३, औषध निर्माता २, कनिष्ठ लिपिक-१, शिपाई १, कक्ष सेवक १, बाह्य रुग्ण सेवक १, सफाईगार १ ही पदे रिक्त आहे. उप जिल्हा रुग्णालय सुरू झालेपासून वरिष्ठ लिपिक येथील कार्यालयाला मिळालेला नाही हे विशेष. या उप जिल्हा रुग्णालयात एकूण ४६ पदांना मंजुरी आहे. यापैकी १७ पदे रिक्त आहेत. या उप जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, भूलतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. हे रुग्णालय ५० बेडचे आहे. मात्र येथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे उप जिल्हा रुग्णालय ओपीडीवर चालले आहे. येथे सोनोग्राफी करण्याची यंत्रणा आहे परंतु ती देखील बंद आहे. शिवाय बालकांना ठेवण्यासाठी जी काचेची पेटी असती ती देखील बंदच आहे. प्रयोगशाळेतील उपकरणे धुण्यासाठी देखील पुरेसे पाणी नाही. स्वच्छतागृह तर पाण्याअभावी बंदच आहेत. यासाठी पाण्याचा टँकर घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे गेला तर त्याला परवानगी मिळत नाही. येथील रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना करमणुकीसाठी दोन ठिकाणी एलसीडी टीव्ही बसविण्यात आले होते. ते गायब झाले आहेत. तेथे फक्त रिकामे ब्रॅकेट आहेत. मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी येथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे परंतु तो कर्मचारी हे काम करत नाही. बाहेरील व्यक्ती बोलावून शवविच्छेदन करावे लागते याचा भुर्दंड मयताच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. येथे दोन रुग्णवाहिका आहेत. त्या बाहेर गेल्या असतील तर रुग्णवाहिकेचे नियोजन करणारा कर्मचारी अधिकृत रुग्णवाहिकेला रूग्ण न देता बाहेरील खासगी गाडीला रुग्ण घेऊन पाठवले जाते ही भयंकर घटना आहे. उप जिल्हा रुग्णालयाचा पदभार वैद्यकीय अधीक्षक पोकर्णा यांच्याकडे आहे परंतु तेच इकडे फिरकत नाहीत. म्हणून येथील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेनंतर येतात मात्र वेळेत बाहेर जातात. शिवाय रुग्णांशी आपुलकीने वागत नाहीत आदी प्रकारामुळे रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे. अनेक ठिकाणी गाद्या गायब आहेत. ना डॉक्टर, ना पेशंट अहमदनगर : चार वर्षापूर्वी दररोज २५० पेक्षा जास्त ओपीडी असणाऱ्या वांबोरी (ता. राहुरी) येथील ग्रामीण रुणालयात गुरूवारी सकाळी भीषण शांतता होती. या ठिकाणी ना डॉक्टर, ना पेशंटचा पत्ता होता. एक शिपाई, दोन नर्स, रुग्णवाहिकेचा चालक आणि आंतररुग्ण विभागात दाखल पेशंट शिवाय अन्य कोणीच नव्हते. वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचा लौकीक मोठा आहे. पूर्वी शेवगाव-पाथर्डी पासून, राहुरी, श्रीरामपूरपर्यंत रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असे. या ठिकाणी ३० बेडचे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय आहे. त्यात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन गृह आहे. याशिवाय अनेक वर्षापासून येथील क्ष किरण गृह बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी दोन वर्षापासून दंतचिकित्सकाची खुर्ची देण्यात आलेली आहे. त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये असून सध्या या खुर्चीचे तीन ठिकाणी तीन भाग ठेवण्यात आलेले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वांबोरी हे राहुरी तालुक्यात सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. यामुळे या ठिकाणी रूग्णालयात बाळंतपण करून घेण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे भौतिकदृष्टया सुसज्ज असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. रुग्णालयात प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. मात्र, विविध आजारांची चाचणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय कीट नसल्याने रक्ताच्या चाचण्या करण्यावर निर्बंध येत आहेत. या ठिकाणी कटारिया दाम्पत्याकडे रुग्णालयाचा चार्ज आहे. त्यांच्या माहितीनुसार येत्या सोमवारपासून क्ष किरण विभाग सुरू होणार आहे. शिवाय वैद्यकीय अधिकारी यांचे एक पद रिक्त आहे. दोन डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्टिंगनंतर रुग्णालयाची बाजू मांडताना डॉ. कटारिया यांनी सांगितले की, रुग्णालयात दररोज ६० च्या जवळपास ओपीडी असते. गुरूवारी या ठिकाणी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने ओपीडी फारशी नसते. आम्ही या ठिकाणी २४ तास सेवा देतो. यामुळे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत ओपीडी पाहतो. साथजन्य आजारांचा उद्रेक झाल्यास सर्व औषधे पुरेशा प्रमाणात आहेत. सर्प, श्वान दंश औषधांचा पुरेसा साठा आहे. असे असतांना रिकामे असणारे रुग्णालय बरेचसे प्रश्न उपस्थित करत असून त्यांची दाखल आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना सरकारी वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा. राहात्यात समाधानकारक सेवाशिर्डी : साईबाबा संस्थानचे माफक दरात सेवा देणारे अद्ययावत रूग्णालय व प्रवरा ट्रस्टचे रूग्णालयासह खेडोपाडी पसरलेले वैद्यकीय सेवेचे जाळे, यामुळे तालुक्यात शासकीय आरोग्य सेवेचा भार हलका झाल्याने अन्य तालुक्यांच्या तुलनेत राहाता तालुक्यातील नागरिक वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सुदैवी आहेत़ गुरूवारी लोकमत चमूने तालुक्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला असता शिर्डीतील बंद अवस्थेतील इमारत व अस्तगाव केंद्रावरील रूग्णवाहिका चालकाने दिलेला दगा वगळता राहाता, कोल्हार, पुणतांबे, बाभळेश्वर आदी ठिकाणी समाधानकारक सेवा आढळून आली़ विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध होता़ राहाता ग्रामीण रूग्णालयात रूग्णालयाची वेळ नऊची असताना एक वैद्यकीय अधिकारी साडेनऊ, तर महिला वैद्यकीय अधिकारी साडेदहाला पोहोचल्या.सुदैवाने दोघेही राहात्यातच वास्तव्याला आहेत़ रूग्णांची संख्या बऱ्यापैकी होती़ येथे दोन रूग्णवाहिका आहेत़ या ठिकाणी रोज सव्वाशे ते दिडशेची ओपीडी आहे़ अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी गेल्या पंधरा दिवसांपासून रजेवर आहेत़ त्यांचा कार्यभार दाढ येथील डॉक्टरांकडे असल्याने ते वेळेत आलेले नव्हते़ तोवर दहा ते पंधरा रूग्ण चौकशी करून परत गेले़ दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचाच फलक येथे लटकलेला आहे़ रूग्णवाहिका मात्र चालकाच्या घरी आढळली़ केंद्राला संरक्षक भींत नसल्याने सुरक्षिततेसाठी गाडी घरी लावल्याचा खुलासा त्याने केला़ तर तातडीच्या रूग्णासाठी फोन करून तासभरानंतरही रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही़ यावरही संबंधित चालकाने आपले कॉन्ट्रक्ट संपलेले असल्याचे सांगितले़ येथे नवीन इमारतीचे काम सुरू असून सध्या सुरू असलेल्या तात्पुरत्या केंद्रात शस्त्रक्रिया विभागालाच कुलूप लावलेले आढळले़ पुणतांबा केंद्रात सकाळी सातलाच कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू झालेल्या होत्या़ येथे वैद्यकीय अधीक्षक व एक परिचारिकेचे पद रिक्त आहे़ रोज सत्तर ते पंच्याहत्तर ओपीडी असलेल्या या ग्रामिण रूग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहेक़ोल्हार केंद्रावरील डॉक्टरही वेळेत उपस्थित आढळले, तर बाभळेश्वरच्या उपकेंद्रावर सर्व महिलाराज आहे़ एक आरोग्य सेविका व एक सहाय्यकाच्या भरोशावर जवळपास आठ हजार नागरिकांचे भवितव्य अवलंबुन असले तरी प्रवरा ट्रस्टच्या उपकेंद्राचा रूग्णसेवेला चांगला आधार आहे़ शालिनीताई विखे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना शिर्डीत उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली़ मात्र या इमारतीचे अद्याप उद्घाटन झालेले नाही़ तालुक्यात राज्य शासनाच्या नियंत्रणातील तीन ग्रामीण रूग्णालये व जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच तीस उपकेंद्रे आहेत़ तालुक्यात २३ डॉक्टर्स, ३४ परिचारिका, १७ आरोग्य सेवक व २३७ आशासेविका आहेत़ ग्रामीण रूग्णालय वगळता सर्व रूग्णवाहिकेचे चालक कंत्राटी आहेत. ग्रामीण रूग्णालयात पुणतांब्यात अधीक्षक, तर राहात्यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत,अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ संजय गायकवाड यांनी दिली़परिचारिकांच्या हाती रुग्णांची नाडीपारनेर : स्थळ : निघोज प्राथमिक आरोग्य केंद्ऱ वेळ : सकाळी दहा वाजताची़ दोन युवक आजारपणाचे सोंग घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात़ तेथे एकही डॉक्टर नाही़ परिचारिकांनीच या तरुणांना तपासले व औषधेही दिली. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांची आढळून आली़ तर सुपा, नांदुरपठार,पिंपळगाव रोठा,करंदी येथील आरोग्य केंद्राला टाळे होते़ निघोज आरोग्य केंद्रातील डॉक्टर शिरुरला राहतात़ त्यामुळे ते आरोग्य केंद्राकडे कधीच फिरकत नसल्याचे तेथील रुग्णांनी सांगितले़ रुग्णवाहिकेचे डिझेल संपल्याने ती बंद असल्याचे सांगण्यात आले़ डॉक्टर नसल्यामुळे निघोज, अळकुटीमध्ये परिचारिकाच रुग्णांची तपासणी करुन औषधे देत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले़ भाळवणीत दुपारी चार वाजता शुकशुकाट होता. तेथील डॉक्टर नगरला राहतात. पळवे खुर्द, रुई छत्रपती येथे रुग्णवाहिका नाही़ तर श्वानदंश व सर्पदंशावरील लस अनेक उपके ंद्रांमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून आले. हंगा आरोग्य केंद्रात दोन महिला उपस्थित होत्या़ पण तेथे डॉक्टर व लस उपलब्ध नव्हती़ रुई छत्रपती आरोग्य केंद्रात लस होती. पण एकच डॉक्टर व इतर सेवक दवाखाना सांभाळत होते. तेथे रुग्णवाहिकेला चालकच नसल्याने ती बंद होती़ सुपा येथील बाजारतळाजवळ असणारे आरोग्य केंद्राला कुलुपच होते. बराच वेळ थांबूनही तेथे कोणीच आले नाही. पळवे बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. साळुंके हे रजेवर होते़ ते सुपा येथे राहतात. त्यामुळे रात्री येणाऱ्या रुग्णांना सुप्याचा रस्ता धरावा लागतो. या आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात पण तेथे रुग्णवाहिका नसल्याने महिलांचे हाल होतात, असे मनीषा हारदे या महिलेने सांगितले. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर उपस्थित होते. दुसरे डॉक्टर कधीकधी येत असल्याचे एका रुग्णाने सांगितले. तेथील प्रयोगशाळेत अडगळीचे साहित्य ठेवल्याचे दिसून आले़ खडकवाडी केंद्रात डॉक्टर नाशिकला गेल्याचे सांगण्यात आले़ अळकुटी उपकेंद्रात सकाळी एकही डॉक्टर नव्हते़ केवळ दोन संगणक चालविणाऱ्या महिला उपस्थित होत्या. सकाळीच एका महिलेचे बाळंतपण केल्याने परिचारिका घरी गेल्या आहेत, असे सांगण्यात आले़ येथे आठ रुग्ण डॉक्टरांची वाट पाहत होते़ परंतु डॉक्टर आलेच नाहीत़ (तालुका प्रतिनिधी)रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी नव्हे तर खासगी सेवेसाठीअस्तगाव : राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातंर्गत सुमारे ३७३३ लोकांचा समावेश आहे़ मात्र, या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी नव्हे तर खासगी सेवेसाठी असल्याचे निदर्शनास आले़ गुरुवारी सकाळी ९-३९ वाजता अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील चित्र पाहिले तेव्हा आरोग्य सेविका, डाटा आॅपरेटर, फार्मासिस्ट आरोग्य सेवक गप्पात रंगलेले दिसले़ तर रुग्ण डॉक्टरांची वाट पहात होते. डॉक्टर कधी येणार अशी विचारणा केली असता डॉ.आर.बी. गोर्डे १ आॅगस्टपासून १५ दिवसांच्या रजेवर गेले असल्याचे समजले. अतिरिक्त चार्ज डॉ.खैरनार यांच्याकडे असून, ते अद्याप आले नसल्याचे उत्तर मिळाले. डॉ.खैरनार यांच्याकडे फोनवर संपर्क साधला असता माझी गाडी पंक्चर झाली मी येत आहे असे सांगितले. सदर डॉक्टरांचे ११ वाजता दवाखान्यात आगमन झाले. आरोग्य केंद्रात सर्पदंश, रेबीज, बी.सी.जी., कावीळ आदी लसीकरण सुविधा उपलब्ध होत्या. परंतु रुग्णवाहिका हवी आहे मला अति तातडीने पेशंट राहाता अथवा नगरला न्यावयाचे आहे असे सांगितले असता रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर शिवाजी गोर्डे यांच्या घरी रुग्णवाहिका लावलेली होती. सकाळी ९़३६ ते १२ वाजेपर्यंत मागणी करूनही रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आली नव्हती. यासंदर्भात चालकाकडे विचारणा केली असता ‘गाडी घरीच असते, मी कंत्राटी बेसिसवर कामगार आहे माझे कंत्राट संपलेले आहे ’असे सांगितले. जर कंत्राट संपलेले असेल तर सदर व्यक्तीच्या ताब्यात गाडी कशी? व ती प्राथमिक आरोग्य केंद्रात न राहाता घरी कशी याची विचारणा केली असता प्रभारी डॉ.खैरनार यांनी माहिती देण्यास तसेच लॉग बुक वा लेखी देण्यास नकार दिला. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तेही रजेवर असून, डॉ.गायकवाड यांच्याकडे कारभार असल्याचे समजले.