शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
3
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
4
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
5
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
6
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
7
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
8
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
9
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
10
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
11
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
12
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
13
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
14
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
15
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
16
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
17
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
18
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
19
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
20
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:58 AM

सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात,

शेवगाव : सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात, अशी टीका राष्टÑवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विखे यांच्यावर केली आहे.जगताप यांनी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, ढोरसडे, अंत्रे, शहरटाकळी, भाविनिमगाव, मठाची वाडी, घोटण, गदेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी, लाडजळगाव, चापडगाव, तसेच शेवगाव शहरातील विविध प्रभागात रविवारी प्रचार सभा घेतल्या. यावेळी शहरटाकळी येथील सभेत त्यांनी ही टीका केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे, राम साळवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, संदीप मोटकर आदी उपस्थित होते़जगताप म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर उत्तरेची मंडळी निघून जाणार आहे. आपण मात्र जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणार असून नगर बरोबरच दक्षिणेचा ‘संग्राम’ म्हणून सेवा करण्यासाठी केव्हाही तत्पर असेऩ हक्काच्या माणसाला साथ करा असे आवाहन त्यांनी केले़सध्याच्या सरकारने शेतकरी, छोटे व्यावसायिक, युवक, महिला, जेष्ठ नागरिक अशा सर्व घटकांना केवळ फसविण्याचे काम चालविलेले आहे़ त्यामुळे घोषणाबाज, थापेबाज सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असे नरेंद्र घुले यांनी सांगितले़ यावेळी मुकुंद जमधडे, बाबूलाल पटेल, सचिन फटांगडे, संजय पवार, राहुल बेडके, राम घुमरे, सखाराम लवाळे, निवृत्त दातीर, दिनकर बडधे, मारुतीराव जाधव, जगन्नाथ गावडे आदींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019