अहमदनगर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीप्रसंगी माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना खुर्ची न मिळाल्याने ते स्टेजच्या खाली उतरले. ते पाहिल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना पुन्हा स्टेजवर बोलावून खुर्ची देण्याची व्यवस्था केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सर्व मान्यवर खुर्चीवर विराजमान होत असताना राम शिंदे यांच्यासाठी खुर्चीचे व्यवस्था नव्हती. ते पाहून त्यांचा चेहरा एकदम उतरला व ते थेट स्टेजच्या खाली निघून गेले. हे मानापमान नाट्य फडणवीस यांनी पाहताच राम शिंदे यांना पुन्हा स्टेजवर बोलावून घेत त्यांना पाठीमागील एक खुर्ची घेऊन आपल्या शेजारी बसवून घेतले.
एका बाजूला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे तर दुसऱ्या बाजूला आ. राम शिंदे यांना बसविण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या मानापमान नाट्याची चर्चा रंगली आहे.