क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने डाॅ. मुटकुळे यांनी ‘पुन्हा क्रांतिज्योती’ हे एकपात्री नाट्य सादर केले. त्यावेळी ते बोलत होते. माळी समाज पंच कमिटी, सावित्रीच्या लेकी महिला प्रतिष्ठान, महात्मा फुले युवा प्रतिष्ठान व अखिल भारतीय समता परिषद यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, ॲड. ज्योती मालपाणी, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मालपाणी, डॉ. शालिनी सचदेव, शिक्षिका प्रमिला भुजबळ, संगमनेर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी सुजाता सांगळे, नगरसेविका मालती डाके, सुहासिनी गुंजाळ, डाॅ. किशोरी मंडलिक, डाॅ. रूपाली ताम्हाणे, गुंजन कर्पे आदींना सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
डॉ. मुटकुळे म्हणाले, घराघरांत असलेल्या ज्योती विचाराने पेटविल्या, तर उद्याच्या युगासाठी प्रकाश मिळेल. त्यांच्या पायातील पारंपरिक विचाराच्या बेड्या केवळ शिक्षण तोडू शकेल. समाजाला उद्धारासाठी फुल्यांचे विचार तारणारे ठरू शकतील. माणसे मारून प्रश्न सुटत नसतात. माणसे पोटासाठी खून करतात तेव्हा, समाजाने विचार करण्याची गरज आहे. समाजात आजही जाती, पातीच्या भिंती उभ्या आहेत. माणूस त्यात वाटला जात आहे. आपण माणूस म्हणून उभे राहणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी करत उद्याच्या संघर्षासाठी क्रांती करावी लागेल.
---------
फोटो नेम : सोमनाथ
ओळ : ‘पुन्हा क्रांतिज्योती’ हे एकपात्री नाट्य सादर करताना नाट्यलेखक, नाट्यकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळ.