राहुरी : ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही बंद पडली आहे.भातामध्ये विषारी औषध टाकून ते धरणाच्या विविध भागांत टाकले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. विषारी भातामुळे अल्पावधीत मासे बळी पडत होते. शॉर्टकट पद्धतीने विषारी प्रयोग करून मुबलक प्रमाणावर मासे सहजगत्या जमा करण्याचे बिंग फुटले. विषारी औषधांचा प्रयोग बंद झाल्याने ग्राहकांना दर्जेदार मासे उपलब्ध होऊ लागले आहेत.मुळा धरणासाठी राहुरी पोलीस स्टेशनकडे पोलीस संरक्षण मागण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तीन पोलीस उपलब्ध करून दिल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. याशिवाय धरणावर असलेल्या चौकीवरील दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व ठेके दाराचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.रात्रंदिवस मुळा धरण परिसरात सशस्त्र पोलीस पहारा सुरू झाल्याने अवैधरीत्या मच्छिमारीला बे्रक बसला आहे. अवैधरीत्या मच्छिमारी करणा-यांना बंदी घालण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पाटबंधारे खात्याने सुरक्षा कर्मचा-यांचा बायोडाटा मागविला आहे. याशिवाय ओळखपत्र कुणाला दिले याचीही माहिती मागविली आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर भातामध्ये विष टाकून मच्छिमारी केली जात होती़ अनधिकृतरीत्या केले जाणारे कृत्य बंद पाडण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी ४४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्यामुळे मच्छिमारीसाठी विषाचा प्रयोग कुणालाही करून दिला जाणार नाही. आम्ही धरणात मच्छबीज सोडले आहेत. विषारी प्रयोगामुळे लहान मासे मृत्युमुखी पडून नुकसान होते. त्यामुळे जाळे टाकूनच मच्छिमारी केली जाणार आहे. विष कालवून मच्छिमारी करणा-यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे भविष्यकाळात अपप्रवृती सहन केल्या जाणार नाहीत. -बिलाल खान, ठेकेदाऱराहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तीन पोलीस उपलब्ध करून दिले आहेत. धरण चौकीवर असलेले दोन पोलीस व पाटबंधारे खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ठेकेदाराने सुरक्षा व्यवस्था क डक केली आहे़ कडक पहारा सुरू केल्याने अपप्रवृतीला आळा बसला आहे. - शामराव बुधवंत, धरण अभियंता.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : मुळा धरणावर शस्त्रधारी पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:38 PM
‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही बंद पडली आहे.
ठळक मुद्देविषारी औषधाने मच्छिमारीला ब्रेकठेकेदाराचे ४४ कर्मचारी संरक्षणासाठी सरसावले