शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच एनआरसीचा फटका अधिक-बी. जी. कोळसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:21 PM

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे.

अहमदनगर : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे मुस्लिमविरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. खरं तर देशातील ५० टक्के लोकांकडे जन्माचे दाखलेच नाहीत. परिणामी एनआरसीचा फटका मुस्लिमांपेक्षा हिंदुंनाच अधिक बसणार आहे. त्यामुळे सर्वांनीच या कायद्याविरोधात रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. गुरूवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले असता त्यांनी एनआरसी, सीएएवर सविस्तर भाष्य केले. मोदी सरकार एनआरसीच्या माध्यमातून देशात अराजकता पसरवत आहे. ज्यांना संविधानाने या देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे, त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. वरकरणी एनआरसी, सीएए हे मुस्लिमविरोधात दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याचा फटका देशातील एससी, एसटी, ओबीसी यांनाच अधिक बसणार आहे. कारण एनआरसीसाठी जन्माचे पुरावे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात १९८५ च्या आधी जन्मलेल्या  बहुतांश लोकांकडे असे पुरावेच नाहीत. देशात अशी निम्मी लोकसंख्या आहे. मूठभर देशविरोधी लोकांना बाहेर काढण्यासाठी हे सरकार पूर्ण देशाला वेठीस धरत  आहे.  हा प्रकार म्हणजे घरात  घुसलेला ढेकूण काढण्यासाठी घरच पेटवून देण्यासारखा आहे, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.देशावर आधी ५० लाख  कोटींचे कर्ज होते. त्यात मोदी सरकारने ४० लाख कोटींची भर टाकली. हे कर्ज घेऊन उद्योगपतींना सवलतीची खैरात केली, तर दुसरीकडे गरिबांच्या हातातून पैसा काढून घेतला. त्यामुळे मंदीचे वातावरण तयार झाले आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.निवडणुकीसाठी युध्दमोदी सरकार भावनिक मुद्दे करून निवडणुका जिंकते. पुलवामा, ३७० कलम आदी मुद्दे आता संपले आहेत. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीवेळी पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी युद्ध छेडले जाईल. त्यातून देशभर भावनिक वातावरण करून निवडणुका पदरात पाडल्या जातील. यात दोन्ही देशांचे नुकसान करण्याचा डाव मोदी सरकारचा आहे, असा आरोपही कोळसे पाटील यांनी केला. दिल्लीची दंगल गुजरात पॅटर्नसीएएविरोधात मुस्लिम महिलांनी दिल्लीत छेडलेले आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीत गुजरात पॅटर्न दंगल घडवण्यात आली. भाजपचे नेते वेळोवेळी हे आंदोलन मोडून काढण्याची भाषा करत होते, असा गंभीर आरोपही कोळसे यांनी केला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत