अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या रविवारी घटली आहे. जिल्ह्यात ५५८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यांतील रुग्णसंख्या प्रथमच शंभराच्या आत आली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊन ती ४ हजार ७६९ इतकी झाली आहे. ८६४ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११९ आणि अँटिजन चाचणीत २४१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (९१), अकोले (७०), पारनेर (६५), श्रीगोंदा (६२), राहाता (४५), पाथर्डी (३७), शेवगाव (३३), नेवासा (३३), राहुरी (२४), नगर ग्रामीण (२२), जामखेड (१९), कर्जत (१९), श्रीरामपूर (१४), नगर शहर (१२), कोपरगाव (१०), इतर जिल्हा (१०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
---
कोरोना स्थिती
एकूण रुग्ण - ३,१६,६०१
बरे झालेले - ३,०५,३९२
उपचार घेणारे - ४७६९
मृत्यू - ६४४०