अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ५४५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५० हजार २२३ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४५ हजार ३८२ इतक्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे सध्या ४ हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६९ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१२२), अकोले (४५), जामखेड (२३), कोपरगाव (१०), नगर ग्रामीण (३७), पारनेर (१४), पाथर्डी (५२), राहुरी (१०), शेवगाव (१९), श्रीगोंदा (२४), श्रीरामपूर (२१), नेवासा (३०), राहाता (४२), संगमनेर (७६), कर्जत (२०) येथील रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात शनिवारी ७७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहर १४०, अकोले ७९, जामखेड ३७, कर्जत २३, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ३१, नेवासा ४४, पारनेर ३३, पाथर्डी ६६, राहाता ८२, राहुरी २६, संगमनेर ४०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ३२, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
शनिवारी १६ जणांचा मृत्यूशनिवारी १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूसंख्या ७८७ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. सप्टेंबर महिन्यात रोज १८ ते २० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले आहेत. एक आॅक्टोबरपासून गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. तसेच रोज मृत्यू होणाºयांची संख्या पाचपर्यंत खाली आली होती. मात्र शनिवारी एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे दिसते आहे.