नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मार्चपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लॉकडाऊन होण्याच्या भीतीने अहमदनगर येथून मागील महिन्यात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे परतले. परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने नगर येथून चार विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. मागील आठवड्यापर्यंत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. गेल्या आठ दिवसात मात्र मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढू लागल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे. दोन अडीच महिन्यांपूर्वी लांब पल्ल्यांच्या रेल्वेचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी आता तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या घटलेली नाही.
..........
पहिली लाट ओसरल्यानंतर
प्रवाशांची संख्या वाढली होती
मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावाकडे गेलेले परप्रांतीय कामगार जनजीवन सुरळीत झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात येऊ लागले. मागील पाच ते सहा महिन्यात नगरमधून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर कामगार गावी परतू लागल्याने गर्दी वाढली होती. आता गाड्या नियमित सुरू आहेत. मात्र, गर्दी ओसरली आहे.
.........
प्रवाशांच्या संख्येनुसार विशेष रेल्वेचे नियोजन
मागील काही दिवसात उत्तर प्रदेशमधील लखनऊ, दानापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने चार विशेष रेल्वे गाड्यांची नियोजन करण्यात आले होते. मागील वर्षीही परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या वाढली तर विशेष रेल्वेचे नियोजन केले जाते.
.......
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागील आठवड्यापर्यंत मोठी गर्दी होती. आता गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही दिवसांपूर्वी चार विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे रेल्वे प्रवाशांवर बंधनकारक आहे.
- एन. पी. तोमर, रेल्वे स्टेशन मास्तर, अहमदनगर
--------
डमी
नेट फोटो -
तिकीट
ट्रेन
पैसे
२० ट्रेन तिकीट कलेक्शन डमी
ट्रेन तिकीट