अहमदनगर : कोरोनाबाधित होत असलेल्या रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी घटली आहे. नगर शहरातील निम्म्याने संख्या घटली आहे. रविवारी २४ तासात ३३२७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी ३७९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजार ९२८ इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२२०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४१५ आणि अँटिजन चाचणीत ६९२ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ६५, अकोले २२, जामखेड २२१, कर्जत ५३, कोपरगाव १८, नगर ग्रामीण ९७, नेवासा ९९, पारनेर ७८, पाथर्डी १०३, राहाता २१, राहुरी १३, संगमनेर १९, शेवगाव २६९, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर ३०, कँटोन्मेंट बोर्ड १३ आणि इतर जिल्हा २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २७७, अकोले ३०, जामखेड ०५, कर्जत १३, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण १९९, नेवासा ७३, पारनेर ५७, पाथर्डी २१, राहाता २४६, राहुरी ५७, संगमनेर १५८, शेवगाव ३३, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ९९, कँटोन्मेंट बोर्ड ११ आणि इतर जिल्हा ३४ आणि इतर राज्य ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत रविवारी ६९२ जण बाधित आढळून आले. नगर शहर ७९, अकोले ०१, जामखेड ४९, कर्जत ४३, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ४६, नेवासा ४१, पारनेर ६१, पाथर्डी ५१, राहाता २९, राहुरी १०३, संगमनेर १३, शेवगाव २५, श्रीगोंदा ६४, श्रीरामपूर ३७, कँटोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान २४ तासात १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
---------------
बरे झालेली रुग्ण संख्या : १,८१,०८५
उपचार सुरू असलेले रूग्ण : २५९२८
मृत्यू : २३०१
एकूण रूग्ण संख्या : २,०९,३१४
-------
शेवगाव, नगर तालुक्यात रुग्ण वाढले
रविवारी नगर शहरात ४२१, नगर तालुक्यात ३४२, तर शेवगाव तालुक्यात ३२७ रुग्णांची भर पडली. त्या खालोखाल राहाता, जामखेड, नेवासा, पारनेर आणि संगमनेर या तालुक्यांचा क्रमांक लागतो. प्रत्येक तालुक्यात रोज शंभरच्यावर रुग्णांची संख्या आढळून येत आहे. अकोले तालुका आणि भिंगार शहरातील रुग्णसंख्या मात्र ६६ आणि ५३ इतकी आहे. त्यामुळे या भागात कोरोनाचे रुग्ण घटल्याचे दिसले.