सोमवारी ३२६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६४ हजार ३६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ९६.८३ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ४८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ९९३ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५९ आणि अँटिजेन चाचणीत २०६ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१५), राहाता (१३), संगमनेर (३८), श्रीरामपूर (३९), नेवासे (३८), नगर तालुका (११), पाथर्डी (३९) अकोले (२१), कोपरगाव (१७), कर्जत (३९), पारनेर (३७), राहुरी (५९), भिंगार (१), शेवगाव (४६), जामखेड (२८), श्रीगोंदा (३७), इतर जिल्हा (५) येथील रुग्णांचा समावेश आहे. राहुरी वगळता इतर सर्व तालुक्यात सोमवारी ५०च्या आत रुग्ण आढळले.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:28 AM