अहमदनगर : कोरोनाबाबत जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी ५७ जण कोरोनाबाधित आढळले, तर बरे झाल्याने ३०२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा नऊशेच्या खाली आली असून ८५५ जणांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६ आणि अँटीजेन चाचणीत ९ रुग्ण बाधीत आढळले. त्यामध्ये नगर शहर (१८), कोपरगाव (८), नगर ग्रामीण (१३), संगमनेर (३), शेवगाव (१), इतर जिल्हा (३), पारनेर (१), राहाता (५), राहुरी (२) शेवगाव (२), श्रीगोंदा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज ३०२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ७९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे.
--------
बरे झालेली रुग्ण संख्या : ७१७९४
उपचार सुरू असलेले रूग्ण : ८५५
मृत्यू : १११६
एकूण रूग्ण संख्या : ७३७६५