शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

नगरमध्ये शिवभोजन थाळीसंख्येत दीडपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 4:55 PM

त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.

अहमदनगर : राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने गरजूंच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिवथाळीचे उद्दिष्ट दीडपट वाढवले असून नगर जिल्ह्यात पूर्वी दैनंदिन ३ हजार ५०० थाळ्या मिळत होत्या. त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना २८ मार्च ते २० एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपाची संख्या ५ लाखांनी घटली आहे. यामुळे राज्य सरकारने हे घटलेले प्रमाण भरून काढण्यासाठी २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत सुरू असणाऱ्या शिवभोजन थाळी वाटपात दीड पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगर जिल्ह्यात शुक्रवार (दि़२४) दररोज ४ हजार ७५० थाळ्या मिळणार आहेत.गरीब लोकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, म्हणून राज्य शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. परंतु कोरोनाच्याकाळात सध्या ती केवळ ५ रूपयांत मिळत आहे. काही केंद्रचालक तर हे ५ रुपयेही लाभार्थ्यांकडून घेत नाहीत. सध्या एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी केंद्रचालक जेवणाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवतआहेत.शहरात गुरूवारी झालेले थाळी वितरणबळीराजा हॉटेल- २५३, हॉटेल दत्ता २०२, हमाल पंचायत २५०, हर्षवर्धन केटरिंग १५७, आवळा पॅलेस २०६, रेव्हेन्यू कँटिन २००, हॉटेल सद्गुरूकृपा १५७, सुवर्णम् प्राईड ३८६, हॉटेल वूड लॅण्ड, पारनेर ८७, कृष्णा भोजनालय ३६४, हॉटेल समर्थ, अकोले १२९, हॉटेल स्वामी समर्थ १८५, हॉटेल श्रीकृष्ण, कर्जत १५१, तिवारी हॉटेल १८७ आणि तृप्ती भोजनालय ७३.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय