मंगळवारी निवडणुरीसाठी अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्या. इंटरनेट गती कमी झाली होती. तसेच सर्व्हरमध्ये अडचण आल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहु नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणुन आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (ऑफलाईन) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने बुधवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्यात आला आहे. ऑफलाईन पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये आर.ओ. लॉगिनमधुन भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. --------------
जातवैधता प्रमाणपत्र पावती ऑफलाईन स्वीकारणार
निवडणुक विषयक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची / जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवयश्कता असते. अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणुन बुधवारी (दि. ३०) अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहेत. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपायुक्त तथा प्रकल्प संचालक यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला तशा सूचना दिल्या आहेत. ऑफलाईन पध्दतीने अर्ज दिलेले आहेत, अशांनी अर्जासोबत उमेदवारांचे नाव, त्यांचा रजिस्टर नंबर व पावती नंबर आदी माहिती दिनांक १ जानेवारी पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.