शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:04 PM

लोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.

गणेश आहेरलोकमत न्यूज नेटवर्कलोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.कोरोनाने उद्योगधंद्यासोबतच ग्रामीण भागातील अर्थकारणही कोलमडले आहे, हातावर पोट भरणाºया मजुरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्याने उद्योगधंद्यांची चाके बंद पडली आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणाºया मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता तालुक्यातही अनेक संस्थांनी १० ते ३० टक्के पगार दिले आहेत. तेथे काम करणारे मजूर घरीच बसून आहेत. तालुक्यातील सधन भागापेक्षा आडगांव, गोगलगाव, खडके,डोºहाळे, कोºहाळे, पिंपरी निर्मळ, केलवड आदी दुष्काळी भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.राहाता तालुक्यात स्थानिक नागरिकांबरोबर परप्रातांतून आलेले २०ते २५ हजार लोक हे विविध व्यवसायाच्या माध्यमातून पोट भरत होते. त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने खायचे काय?असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भंगार विक्रीतून पोट भरणारे बेचैन आहेत. बारा बलुतेदारांचे जगणे विस्कळीत झाले आहे.चौकट.....शेतकरी घायाळकोरोनाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशवंत शेतीमाल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टरबूज पीक ांसाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र सध्या ते बाजारपेठेत नेणे कठीण झाले आहे. हा माल मातीमोल भावात त्यांना विकावा लागत आहे. गोड मका, झेंडूची फुले, भाजीपाला जागेवरच कोमजला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे.--------------------जोडधंदा ही कोरोनाच्या कचाट्यातशेतीबरोबर इतर जोडधंदा असावा म्हणून काही शेतकरी कुक्कुटपालन, दुग्धपालन करतात. मात्र कोरोनामुळे या जोडधंद्यांचेही कंबरडे मोडले आहे. दूध विक्री मंदावली आहे. दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला आहे. शेतकºयांना जनावरे पोसणे कठीण जात आहे. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय आधीपासूनच अडचणीत आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.----------------कोरोनामुळे नैसर्गिक संकट ओढवले आहे. शेतकºयांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून बांधलेले पोल्ट्री फार्मचे कर्ज कसे फेडणार जनावरांना कसे पोसायचे? कष्टाने पीक पिकवूनही ते विक्री न करता फेकू न द्यावे लागते.- विनायक चौधरी, पोल्ट्री व्यावसायिक, गोगलगाव, ता. राहाता--------------------गेल्या आठवड्यात ऐरणीवर हातोड्याचा घाव बसला नाही. त्यामुळे खोपट्यात चूल पेटली नाही. मुलांना पाण्यात पीठ घालून जगवतो आहे. सरकारचा एक छदामही मिळालेला नाही. रेशन दुकानात जाण्यासाठी कार्ड नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणीच वाली नाही.-बाजीराव साळुंके, लोहार व्यावसायिक---दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला,त्यातच आता कोरोना मुळे जीव घायाळतीला आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची चिंता करायची की जीवाची असा प्रश्न आहे. खरिपात जे पेरले ते अतिवृष्टीने वाहून गेले. रब्बीला अवकाळीने झोडपून काढले. आता काय करणार?शिवाजी रामराव शेळके,शेतकरी,आडगांव ता.राहाता,---------------फोटो- १३ लोणी लोहारकोरोना संचारबंदीमुळे लोहार कामही थंडावले आहे. आठवड्यापासून ऐरणीवर घाव घातला नाही. त्यामुळे लोणी येथील बाजीराव सोळुंके यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.