चंद्रकांत शेळके
अहमदनगर : लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच क्षेत्राला बसला तसेव महावितरणही यातून सुटले नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे, एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील दीड लाख ग्राहकांनी वीजबिल भरले नसून ही थकबाकी तब्बल दीडशे कोटींची आहे.
ग्राहकांकडे महावितरणची आधीच कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यात लॉकडाऊनच्या काळातील थकबाकीची भर पडली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून म्हणजे, एप्रिलपासून आजपर्यंत गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा अशा सुमारे दीड ते दोन लाख ग्राहकांनी महावितरणचे दीडशे कोटी रुपये थकविले आहेत. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांचा विजेचा वापर वाढल्याने मोठ्या रकमेची बिले महावितरणने दिली. तर ही बिले चुकीची असून अवास्तव आहेत. त्यामुळे ती कमी करावीत, अशी मागणीही ग्राहकांनी केली आहे.
--------------
लॉकडाऊन काळात ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. बिले भरावी त्यासाठी घरोघरी जाऊन महावितरण आवाहन करत आहे. यामध्ये बिलांची दुरुस्ती तसेच इतर तक्रारींचेही निवारण केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी बिले भरून महावितरणला सहकार्य करावे.
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता महावितरण
-----------------
एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतची वीज थकबाकी
मंडल. ग्राहक. थकबाकी
नगर ग्रामीण २२९८५. ७ कोटी ४४ लाख
नगर शहर तथा ग्रामीण. ४२४२६. २५ कोटी ७७ लाख
कर्जत. १५८३९. ६ कोटी ५४ लाख
संगमनेर. ४३४५१. २२ कोटी ६९ लाख
श्रीरामपूर. ३०९८९. १३ कोटी ८० लाख
-----------------------------------
एकूण. १५६०९०. ७६ कोटी २७ लाख
--------------------------
याशिवाय जिल्ह्यात पथदिव्यांची एकूण २३० कोटींची थकबाकी असून त्यात लॉकडाऊनच्या काळात ५७ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. पाणीपुरवठा योजनांची एकूण ४२ कोटींची थकबाकी असून त्यातील साडेआठ कोटी थकबाकी लॉकडाऊनमधील आहे.
सार्वजनिक सेवांची एकूण थकबाकी चार कोटी असून त्यातील २ कोटी ७० लाख थकबाकी गेल्या आठ महिन्यांतील आहे. याव्यतिरिक्त आतापर्यंत एकूण ३ लाख ७० हजार कृषी ग्राहकांकडे साडेचार हजार कोटींची थकबाकी आहे
--------------