शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

देवळालीचे सुपुत्रजगदीश पाटील कदम यांच्याकडून दीड कोटींची मदत देवळाली प्रवरा साठीही पाच लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 1:38 PM

कोरोना आजराच्या  विषाणू संसर्गाने निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र व पुणे येथील राजपथ इन्फस्ट्रक्चरचे चेअरमन जगदीश लक्षमनराव कदम पाटील यांनी पीएम केअर फंड साठी एक कोटी तर महाराष्ट्र

राहुरी/देवळाली प्रवरा : कोरोना आजराच्या  विषाणू संसर्गाने निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र व पुणे येथील राजपथ इन्फस्ट्रक्चरचे चेअरमन जगदीश लक्षमनराव कदम पाटील यांनी पीएम केअर फंड साठी एक कोटी तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पन्नास लाख रुपये दिले आहेत.या मदतीच्या रकमेचे धनादेश पुणे येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे कडे सुपूर्द केले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यपीएम केअर फंडह्णच्या माध्यमातून देशवासियांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत.जगदीश कदम यांनी या रकमे बरोबरच आपले जन्म गाव असणाऱ्या देवळाली प्रवरा शहरात सुरू असलेल्या अन्न सुरक्षा समिती साठी राजश्री प्रतिष्ठान च्या वतीने पाच लाख रुपये दिले आहेत. कदम यांचे कंपनीमध्ये काम करणार्‍या राज्यातील आणि राज्याबाहेरील १३००कर्मचार्‍यांनीही आपला तीन दिवसांचा पगार एकत्रित करुन सुमारे १६ लाख १२हजार ४००रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिला आहे.कोरोनाच्या आपत्तीमुळे झालेल्या महाभयंकर नुकसानीतून पुन्हा एकदा सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मिती व्हावी यासाठी उचललेला हा खारीचा वाटा आहे, असे जगदीश पाटील-कदम यांनी सांगितले.गतवर्षी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा प्रचंड तडाखा बसला होता. विशेषतः शिरोळ तालुक्याला या महापुराची झळ सर्वाधिक बसली होती. त्याही वेळी जगदीश पाटील यांनी १३०० गॅस शेगड्यांचे वाटप करुन मदतीचा हात दिला होता. मागील काळात जलयुक्त शिवार या राज्य सरकारच्या दुष्काळमुक्ती साठीच्या योजनेतून देवळाली प्रवरा शहरात जलसंधारण ची कामे करण्यासाठी एक पोकलँड मशीन भेट दिलेला आहे.उद्योजक जगदीश कदम हे राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे कनिष्ठ बंधू आहेत.           -चौकट-उद्योजक जगदीश पाटील कदम हे देवळाली शहराचे सुपुत्र आहेत.ते पुण्यात असले तरी त्यांची देवळाली शहराशी असणारी नाळ आजही कायम आहे. शहरवाशीयांवर असणारे त्यांचे प्रेम,जिव्हाळा व काळजी त्यांनी शहरात केलेल्या विविध कार्यातून स्पष्ट झाली आहे.त्यांनी आज शहरातील अन्न सुरक्षा समिती साठी पाच लाख रूपये दिली आहेत.या पूर्वी त्यांनी सोसायटी चौक सुशोभीकरण कामासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत,शहरातील आपल्या वर्गमित्रांना स्वखर्चाने काही दिवसापूर्वी विविध देशाची सफर त्यांनी घडवून आणली,शहरातील जलसंधारण कामासाठी  त्यांनी पोकलेन मशीन भेट दिला आहे.देवळाली प्रवरा च्या शहरवाशीयांच्या वतीने राजपथ इन्फस्ट्रक्चर व राजश्री प्रतिष्ठानला धन्यवाद देतो          -उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे