अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे यांच्यासह पथक व प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, भूषण हांडोरे, बाबासाहेब बढे, विठ्ठल शरमाळे, रवींद्र वलवे, गोविंद मोरे, गणेश शिंदे, राहुल क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याच्या खबरीवरून बुधवारी सकाळी ६ वाजता छापा मारला. तेथे दुधात भेसळ करण्यासाठीच्या १५ गोण्या पावडर, तेल ड्रमसह साहित्य मिळून आले. तेथील ४० लीटर दुधातून चाचणीसाठी दुधाचे नमुने घेतले. जांभळे येथील दूध संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास १ हजार लीटर दूध नष्ट केले. यावेळी अन्न सुरक्षा अधिका-यांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेऊन नमुने तपासणीसाठी घेतले. अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार आहे.