नेवासा : नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात गावठी कट्ट्यासह अशोक उत्तम फुळमाळी यास सोनई पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस नाईक शिवाजी माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. चांदा शिवारात कुकाणा-घोडेगाव रस्त्यावरील पुलावर अशोक उत्तम फुलमाळी (रा. शास्त्रीनगर, चांदा, ता.नेवासा) हा गावठी कट्ट्यासह फिरत आहे. तो गावठी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक कर्पे व त्यांच्या पथकातील सहायक फौजदार संजय चव्हाण, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, बाबा वाघमोडे, आदिनाथ मुळे, रवी गर्जे, गोरख जावळे, मारुती पवार यांनी चांदा शिवारात रात्री साडेनऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी फुलमाळी हा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस व विनानंबर दुचाकीसह मिळून आला. त्यास अटक करण्यात आली. फुलमाळी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर याअगोदर सोनई पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
160521\sonai police.jpg
नेवासा : तालुक्यातील चांदा शिवारात गावठी कट्ट्यासह एक आरोपीस जेरबंद करताना सोनई पोलीस पथक...