अकोले : समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संगमनेर तालुका सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे सामाजिक कार्य सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. ते सेवाभावी कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू आहे. यामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. जनता त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीत मदतीचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराज यांनी एक लाखांची मदत जाहीर केली आहे. संगमनेर सहाय्यता निधीत एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश बुधवारी (१ एप्रिल) संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.