संगमनेर : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता १२ ते २० जुलै दरम्यान संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतो आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कांदा लिलाव बंद करण्याचा व्यापा-यांचा अर्ज आल्याने कांद्याचे लिलाव २० जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकरी हिताचा मोठा निर्णय घेतला आहे.
मंगळवार (२१ जुलै) पासून संगमनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू होणार आहेत. सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस कांद्याचे लिलाव होतील. कांदा या शेतमालाचे वजनमापाचे कामकाज सकाळी साडे आठ ते दुपारी एकपर्यंत चालू असतील, असे सभापती खेमनर, सचिव सतीश गुंजाळ यांनी सांगितले.